मलेशियाला पळून जाताना ८ तबलिघी अटकेत

नवी दिल्ली: कोरोनाव्हायरसमुळे देशभर लाकडाऊन सुरू असताना काही लोक भारतातून मलेशियाला पळून जाण्याच्या तयारीत होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अशा ८ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व मलेशियाचे नागरिक आहेत आणि त्यांच्यावर दिल्लीतील निझामुद्दीन येथील तबलीघी जमातीच्या कार्यक्रमात भाग घेतल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांची नजर चुकवून ते देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे.