__मुंबई : राज्यातील करोना रुग्णांची संख्या थांबताना दिसत नाहीत. राज्यात गेल्या १६ तासांत ५५ नवे करोना रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६९०वर गेली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज पुण्यात सर्वाधिक १७ तर पिंपरी- चिंचवडमध्ये ४ रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये ३. औरंगाबादमध्ये दोन आणि मंबईत २९ रुग्ण आढळल्याने मुंबईत २९ रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६९०वर गेली आहे. यात मुंबईत एक टया धारावीतील करोना रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. तर पुण्यात दोन जणांचा करोनाने मत्य झाल्याने राज्यातील करोनाने दगावलेल्यांची संख्या ३४वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हण दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत एकूण ५२ रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे डोंबिवलीत चार महिलांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यात एक २४ वर्षीय महिला असून ही महिला करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिलाही करोनाची लागण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या चारही महिलांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये आज पाच जणांना करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
मुंबई : राज्यातील करोना चिंचवडमध्ये ४ रुग्ण राज्यात ५५ नवे करोनाग्रस्त; रुग्णांची संख्या ६९०वर