२७ गावांचा वपाड्यांचा धोकादायक प्रवास । विरारजवळीलकण्हेरपुलाची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

विरार (प्रतिनीधी): विरारजवळील कण्हेर आणिआसपासच्या परिसरातील २७ गावांना जोडणारा मुख्य पूल जर्जर अवस्थेत असूनप्रशासन मात्र केवळ बव्याची भूमिका घेत आहेत. हा पूल पाडून नवीन पूल बांगण्यासाठी मंजुरी मिळूनही निविदा प्रक्रिया रखडल्याने रहिवाशांना जुन्या पुलावरूनच धोकादायक प्रवास करावा लागत आहे. कण्हेर गावाच्या वेशीवर असलेला हा एकमेव पूल या परिसरातील २७ हून अधिक गावांना आणि पाडयांना जोडला आहे. या गावातप्रवास करण्यासाही हा पूल एकमेव मार्ग आहे. पण हा पूल अत्यंत जीर्ण आणि जर्जर झाला असूनही कोणत्याही क्षणी कोसळून मोही दुर्घटना होऊ शकते. असे असतानाही प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत अपघाताची वाट पाहतेय की काय, असा सवाल आता ग्रामस्थ करत आहेत. विरारच्या कण्हेर-खार्डी गावांना जोडणारा हा पूल ३० वर्षांहून अधिक जुना आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची निर्मिती करून जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केला होता. पण जिल्हा परिषदेने आतापर्यंत या पुलाकडे लक्ष दिले नाही, तसेच या पुलाची डागडुजी झाली नाही. जर हा पूल कोसळला तर या गावांचा संपूर्ण संपर्क तुटला जाईल, तसेच मोठी जीवितहानी होऊ शकते, असे ग्रामस्थांनी सांगितले. या पुलाचे कठडे जीर्ण होऊन तुटले आहेत, सळया गंजून बाहेर आल्या आहेत, तर पुलाच्या खाली बाजूचे सिमेंट-काँक्रीट निघाले आहे. कोणत्याही क्षणी हा पूल कोसळले, अशी अवस्था या पुलाची झाली आहे, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ सुरेंद्र जाधव यांनी दिली. हा पूल धोकादायक असल्याचा फलक वसई- विरार महापालिकेने काही वर्षांपूर्वी लावला आहे. अवजड वाहनांनी पुलावरून प्रवास करू नये, असेही सांगण्यात आले. मात्र या पुलावरून मोठया प्रमाणात रेती, दगड यांची वाहतूक करणारे ट्रक जातात. त्यामुळे या पुलाचा धोका आणखी वाढला आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार मागील आराखड्यानुसार ९९.९० लाख रुपये या पुलाच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र आता या पुलाचा आराखडाच बदलला असल्याने त्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच हा पूल पाडण्यासाठी आणि पर्यायी रस्ता देण्यासाठी खर्च वाढवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. सव्या या पुलाच्या बांधकामासाठी निधीच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषद अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे जोवर त्याला मंजुरी मिळणार नाही, तोवर निविदा निघणार नसल्याचे तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येणार नसल्याचे पालघर जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता सुरेश शिंगाने यांनी सांगितले. त्यामुळे या पुलाच्या कामासाठी तूर्तास ग्रामस्थांना वाट पाहावी लागणार आहे.