समलैंगिक संबंधातून ५५ वर्षीयाची हत्या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे तरुणाला अटक

ठाणे (प्रतिनीधी) : समलैंगिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ठाकुर्ली येथील बावनचाळ परिसरात बॅगेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून मृतदेह बॅगेत भरण्यासाठी हा तरुण घटनास्थळी पुन्हा आला असता, सीसीटीव्ही चित्रीकरणात टिपला गेल्याने या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आहे. ठाकुली येथील बावनचाळ परिसरात गुरुवारी सकाळी एका बॅगेमध्ये मृतदेह आढळला होता. याबाबत परिसरातील नागरिकांकडून माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्ती५० ते ५५ वयोगटातील होता. त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्याचबरोबर त्याची ओळख पटविण्यास सुरुवात केली होती. त्यादरम्यान, मृत पावलेल्या व्यक्तीचे आणि कोपरी परिसरातन बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे वर्णन मिळते-जुळते असल्याचे समोर आले होते. त्यामळे कोपरी पोलिसांना घटनास्थळी पाचरण करण्यात आले होते. त्यांच्या तपासामध्ये मत व्यक्ती आणि बेपत्ता व्यक्ती एकच असल्याचे उघड झाले होते. मृत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर विष्णनगर पोलिसांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळलेल्या एका २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने कृत्याची कबुली दिली. हत्या झालेल्या व्यक्तीची आणिआरोपी तरुणाची रेल्वे प्रवासादरम्यान ओळख झाली होती. त्यातून दोघांची मैत्री झाली व समलैंगिक संबंधही निर्माण झाले. मृत व्यक्तीअधूनमधून डोंबिवली येथे राहणाऱ्या या तरुणाच्या घरी येत असे. त्या वेळी हा तरुण अविवाहित होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर आरोपी तरुणाने मत व्यक्तीशी संबंध ठेवण्यास नकार दिला. यातूनच या दोघांत भांडण झाले व रागाच्या भरात तरुणाने गळा आवळून ५५ वर्षीय व्यक्तीची बावनचाळ परिसरात हत्या केली. त्यानंतर तोघरी परतला. हत्या केल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून मृतदेह बॅगेत भरण्यासाठी तो स्कूटर घेऊन पुन्हा घटनास्थळी गेला. त्या वेळी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणात तोआढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याआधारे चौकशी करून त्याला अटक केली.