दिल्ली - केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ, सबका विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात येतोय, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात पूर्ण केल्या जातील असा प्रयत्न केला जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांचा जो सबका साथ सबका विश्वास चा नारा आहे त्याप्रमाणेच हा अर्थसंकल्प आहे. त्याचप्रमाणे caring society म्हणजेच प्रत्येकाची काळजी घेईल असा हा अर्थसंकल्प असेल, असं त्या म्हणाल्या. ही आहे नवी करमर्यादा २.५ ते ५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या करदात्यांना अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. या गटासाठी करमर्यादा ५ टक्के होती. आता ती शून्य टक्के झाली आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा? भाषणादरम्यान अर्थ मंत्र्यांनी बेटी बचाओ बेटो बढाओ ही योजना यशस्वी झाल्याचं म्हटलं. त्यावर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. कृपया माझं भाषण ऐकून घ्या आणि या योजनेचं राजकीय भांडवल करू नका असं सीतारामन म्हणाल्या. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला म्हणाले की सर्व माननीय सदस्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. . महिलांसाठीच्या योजनांसाठी २८ हजार ६०० कोटींची तरतूद करण्यात आलोय. .
अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन आणि पोषण सालो पोषण अभियान सुरु केलं गेलं. याचा फायदा महिलांना झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलाय. याच योजनेच्या अनुशंघानं देशातील ६ लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिले जातील आणि त्याद्वारे १० कोटी घरांमधील पोषण अभियानाची माहिती मिळवली जाईल. - पोषण योजनांसाही आर्थिक तरतूट : २०२०-२१ या वर्षासाही पोषणाशी संबंधित चालवण्यात येणाऱ्या योजनांसाही३५ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. मुली शिकण्याचं प्रमाण वाढल्याचा दावा : बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा परिणाम सकारात्मक झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलाय. मुलांपेक्षा मुली शाळेत जास्त प्रवेश करत असल्याची नोंद झालीय. . मुलींच्या माता बनण्याच्या वयोमर्यादेवर विचार होणार : १९७८ साली शारदाअॅक्ट, १९२९ नुसार मुलींच्या लग्नाचं वय १५ वरुन १८ करण्यात आलं. आता हे सरकार मुलींना माता बनण्याच्या किमान वयोमर्यादेवर विचार करेल. एक टास्क फोर्स तयार करुन ६ महिन्यात त्याबाबतचा अहवाल सोपवेल.