महिला व बालविकास करिता महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरिता मनोधौर्य योजना (महिला आणि बालक) बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालके यांच्या पुनर्वसनसाठी आर्थिक सहाय्य पुरविणे या साठी महाराष्ट्र शासन कडून मनोचैर्य योजना राबविण्यात येत आहे. महिला आणि बाल विकास विभाग मनोगैर्य योजनेची अमंलबजावणी करीत आहे. याद्वारे पिडीतांना १ लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणांमध्ये १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. माननीय उच्च न्यायालय निर्देशानुसार योजनेच्या आर्थिक निकषामध्ये बदल करून सुधारित मनोौर्य योजना लागू करण्यात आली आहे. सिंगल विंडो सिस्टिम: या योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्यापासून ते आर्थिक सहाय्य पुरविणे याबाबतची सर्व प्रक्रिया राज्य/ जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण याना हस्तांतरण करण्यात आलीआहे ITPA अधिनियम अंतर्गत मुलींचा समावेश - सुधारित योजनामध्ये ITPA अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या मुलींनाही सहाय्य करण्यात येते माझी कन्या भाग्यश्री योजना १ ऑगस्ट २०१७ पासून महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजने अंतर्गत, शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत: एक मुलगी: १८ वर्षे कालावधीसाठी रु. ५०,००० दोन मुली: प्रत्येक मुलीचे नावे २५ हजार रुपये ७.५ लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ. प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते. मुदत ठेवींच्या निर्मिती साठी रु. २० कोटी (आर्थिक वर्ष २०१७-१८) आणि रु.१४ कोटी रुपये (वित्तीय वर्ष २०१८- १९) वितरित करण्यात आले आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस) आय सी डी एस, हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो.आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात पुरवू इच्छिते. लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे. राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण ५५३ प्रकल्प कार्यरत असून ३६४ ग्रामीण, ८५ आदिवासी विभागात आणि १०४ शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत. या योजनेतंर्गत लाभार्थीना पुरविण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा,पुरक पोषण आहार लसीकरण,आरोग्य तपासणी संदर्भ आरोग्य सेवा,अनौपचारीक शाला- पूर्व शिक्षण । पोषणआणि आरोग्य शिक्षण बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना ज्यातील बालक लिंग गुणोत्तर वृध्दीगंत करण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्याच्या महिला आणि बालकं विकास विभागाने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूरउस्मानाबाद, सांगलीआणि जालना या दहा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची अतिमहत्वाकांक्षी उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंधा करणे. (स्रोण हत्यांना प्रतिबंा करणे) मुलींच्या जिवीताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे, मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना या योजनेचे मूळ उद्दिष्ट गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलका करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारणे. गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला शासनातर्फे मिळणारे आर्थिक लाभ घेता येतात. शासनाकडून दोन हप्त्यांमध्ये एकूण रुपये ६००० मदत दिली जाते. प्रथम प्रसुतीच्यावेळी (रुपये ३०००) आणि बालक सहा महिन्यांचे झाल्यावर (रुपये ३०००) देण्यात येतात. सद्यस्थितीत ही योजना अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे. अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान या योजनेचा शासकीय/ बिगर शासकीय सेवाभावी संस्था जसे को राज्यगृहे, अनाथालये, निवारागृहे, माहेर योजनेतंर्गत संरक्षण गृहे आणि बालगृहे येथे राहणाऱ्या, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलींना लाभ घेता येतो. मुलीच्या नावाने रुपये २५,००० चा धनादेश मुलीच्या नावे तिच्या बँकेतील खात्यात (राष्ट्रियकृत बँकेत जमा करण्यात येतो, जेणे करून तो विवाहसंबंधीत खर्च करू शकेल तसेच भांडीकुडी इत्यादी विकत घेऊ शकेल.