पुणे (प्रतिनिधी)-चिंचवडमधील झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधायुक्त हक्काची घरे मिळवून देण्यासाही राज्य शासन कटिबद्ध असून, झोपडपट्टी पुनर्वसन । प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री व जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्राच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून झोपडपट्टीधारकांना कमी कालावधीत चांगल्या दर्जाची घरे बांधून द्यायला हवीत. झोपडपट्टीधारकांना वर्षभरात अधिकाधिक घरे उपलका करून देण्यासाही प्रयत्न करण्यात येतील. ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्टया प्रसिद्ध असणारया पुण्यातील नागरिकांच्या हिताचे निर्णय शासन गतीने घेणार आहे. मेट्रो, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण अशा मोहया प्रकल्पांची कामे निधीअभावी रखडू नयेत, यासाही वेळेत निधी उपलका करून दिला जाईल.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नियमावलीबाबत लवकरच निर्णय