डोंबिवलीतीलप्रदषित कारखाने२५ दिवसांत स्थलांतरित करा- उद्धव ठाकरे

डोंबिवली (प्रतिनीधा - शंकर जाधव)- कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते, स्वच्छता आणि सुशोभीकरण या कामांसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात नागरी वस्तीजवळील प्रदूषण निर्माण करणारे कारखाने येत्या १५ दिवसांत अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्या, असे आदेश प्रदक्षण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना टिल्याची माहिती मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दिली. त्याशिवाय कल्याण-डाबवला पालिका हहीतील रस्ते, स्वच्छता आणि सुशोभीकरण या कामांसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी डोंबिवली एमआयडीसीत रसायनांमुळे गुलाबी झालेल्या रस्त्याची पाहणी केली. तेथून ते पालिका मुख्यालयात गेले. तेथे त्यांनी पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या. डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी कंपन्यांची अति घातक, कमी घातक आणि प्रटपण न करणारे अशा तीन गटांत वर्गवारी करण्याचे आदेश दिले आहेत