कल्याण (प्रतिनीधी) - २६ जुले आणि ४ ऑगस्ट २०१९ रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे कोपरगाव, कोपररोड या दोन प्रभागातील हजारो कुटुंबीयांच्या घरात पाणी शिरले होते. यात घरातील सामानाचे नुकसान झाले तर अनेक कुटुंबीयांचा संसार उघड्यावर पडला होता.
येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पूरग्रस्तांना शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी म्हणून पाहपुरावा केला. अद्याप शासनाच्या दिरंगाईमुळे पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे ७ महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबीयांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांच्या कार्यालयासमोर धडक मोर्चा काढला. पूरपरिस्थितीतील नागरिकांना दिलासा देण्यासाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पुरग्रस्त कुटुंबियांना १५ हजार रुपये अशी आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र त्यानंतर फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला.शासनाने गरिबांच्या दुख:ची जान ठेऊन याबाबत पूरग्रस्तांना माहिती देणेआवश्यक होते. शासनाची दिरंगाईचा फटका पूरग्रस्तांना बसत असल्याने अखेर पूरग्रस्तांनी शासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी शिवसेनेचे ज्यो” । नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली जवळील कोपरगावापासून निघालेल्या मोच्यनि कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांच्या कार्यालयासमोर भडक दिली. यावेळी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि पूरग्रस्तांनी तहसीलदार दीपक आकडे यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळणे आवश्यक असताना शासनाचे अधिकारी त्याच्यावर का अन्याय करतात? या पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाही शिवसेना आक्रमक होईल असे नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले.