दिल्लीत आम आदमी पार्टी - काँग्रेस एकत्र येणार?

 दिल्ली - राजधानातील निवडणुकांचा रणसंग्राम संपला असून आता सर्वांना उत्सुकता आहे तो निकालाची. मात्र, तत्पूर्वी मतदानांतर विविध माध्यमांच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचेच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर, भाजपाला ५ ते १९ जागा मिळतील असं दाखवलं जात विचारलेल्या आहे. याचबरोबर मागील वेळी एकही जागा न मिळालेल्या काँग्रेसला यंदा किमान ४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते पीसी चाको यांनी काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या युतीचे संकेत दिल्याचे दिसत आहे. माध्यमांनी काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या युतो बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतान चाको म्हणाले, दिल्लीत काँग्रेस व आम आदमी पार्टी एकत्र येणार की नाही, हे निकालावर अवलंबून आहे. एकदा निकाल हाती आल्यानंतरच आम्ही याबाबत विचार करू शकतो. मला असं वाटतं की मतदानानंतर जो सर्वे समोर आला आहे, तो बरोबर नाही. सर्वेनुसार जे सांगितलं जात आहे, काँग्रेसची स्थिती त्यापेक्षाही चांगली राहील.