दोन दिवसांत १८०० रुपयांनी सोनं महागलं

रुपयांनी सोने व चांदीच्या भावात आता पुन्हा अमेरिका व इराणमधील तणावामुळे मोठी भाववाढ झाली आहे. त्यामुळे सोनेच्या किंमतीत मागील सात वर्षाच्या तुलनेने उच्चांकी गाठली तुलनेने उच्चांकी गाठली आहे. १० एप्रिल २०१३ नंतर सोन्याचा हा जागतिक बाजारातील आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. मागील दोन दिवसांत सोन्यामध्ये तब्बल १८०० रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीला एक जानेवारी रोजी सोनं प्रति तोळा ३९ हजार ५०० रुपये होते. दोन जानेवारीला १०० रुपयांनी वाढून ते ३९ हजार ६०० रुपये प्रति तोळा झाला. सोमवारी गोल्ड मार्केट सुरू झाल्यानंतर सोने प्रति तोळा ४१ हजार रुपयांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर दिवसअखेर सोन्याचा भाव प्रति तोळा ४०,९३९रूपये असा स्थिर झाला. सोन्याबरोबरच चांदीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. कमोडिटी बाजारात चांदीचा भाव ७२४ रुपयांनी वधरला असून प्रति किलो ४८२५१ रुपये झाला आहे. तर सकाळच्या सत्रात चांदीने ४८६६० रुपयांचा उच्चांक गाठला होता.