मुंबई (प्रतिनिधी): जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघांच्या पदाधिकाऱ्यांवर व विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध मुंबईतही व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडियाजवळ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनीही सहभाग घेतला. नेहरू विद्यापीठ इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. त्यावेळी बाहेर उभे असलेले पोलीस काय करत होते अशा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, या हिंसाचारामध्ये भाजपचा हात आहे. त्यामुळे या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात शांततेत आंदोलन सुरू आहे. अशाप्रकारे आम्ही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू, असंही ते यावेळी म्हणाले.