दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला निवडणुक

दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या ८ फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी याबाबतची माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजपासून दिल्लीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दिल्लीत या विधानसभेसाठी १ कोटी ४६ लाख मतदार मतदान करणार आहेत. १३ हजार ७५० मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे.